दर्यापूर – महेश बुंदे
तालुक्यातील तोंगलाबाद येथील आयएसओ नामांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने शासनाच्या आदेशानुसार दि. १३ एप्रिल रोजी “शाळा पूर्वतयारी मेळावा” मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनीष बावणेर उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सरपंच वैशाली निरंजन पानझाडे,उपसरपंच सुभाषराव जऊळकार,सदस्या माधुरी अमोल काळे,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मुक्ता संदीप चव्हाण,सदस्य रुपाली दीपक धारपवार,शिल्पा सतीश अटबर आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आयोजित शाळा पूर्वतयारी मेळाव्याला गावातील ऐकून १४ दाखलपात्र विद्यार्थी व त्याचे पालक उपस्थित होते.
