दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर शहरासह आता मेळघाटात अतिगरीब कुटुंबाना आधार देत दर्यापुरातील कौसल्यादेवी जगन्नाथ मालपाणी ट्रस्टने घरकुल, ब्लॅंकेट, साड़ी व किराणा भेट देत सेवेचा परिचय दिला आहे. या करीता दूस्टच्या वतीने दिनेश बछले यांनी सर्वे करुण खरोखर गरिबीत आयुष्य कंठणाऱ्या कुटुंबाना ही मदत करण्यात आली. यासंबंधी कार्यक्रम आयोजित करून मान्यवरांच्या हस्ते भूमीपूजन, साहित्य वाटप करताना उपस्थित महिलांच्या डोळ्यात अश्रु तराळले.

दिनांक ११ एप्रिल रोजी सावित्रीबाई फुले जयंती तसेच रामूसेठ मालपाणी यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलदरा येथील काजलडोह येथे राहत असलेली विधवा पुनियाबाई ईरपाचे या महिलेच्या घरकुलाचे भूमिपूजन समाजसेवक रामुशेठ मालपाणी, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे, माजी वित्त व आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगनीकर, दिनेश बछले, सरपंच साबू लालजी बेटकर, उपसरपंच जितेश बेलकर, दयाराम काळे, गावातील प्रतिष्ठित मंडळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. सर्वप्रथम मान्यवरांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करून सदर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
