शांतता भंग केल्यास कारवाई निश्चित- पोलीस अधिक्षक वाशिम

प्रतिनिधी फुलचंद भगत


मंगरुळपीर:-दिनांक 14.04.2022 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव आणि महाविर जयंती उत्सव संपुर्ण जिल्हयात साजरा करण्यात येत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महाविर जयंती उत्सव अनुषंघाने जिल्हयात अनेक ठिकाणी मिरवणुका आयोजित करण्यात येतात.


कायदा व सुव्यसस्था अबाधित राहणे करीता पुर्वतयारी म्हणुन पोलीस स्टेशन स्तरावर संवेदनशील गावांना भेट देउन शांतता समितीच्या 110 पेक्षा जास्त मिटींग घेण्यात आल्या आहे. डॉ बाबासाहेब जयंती उत्सव अनुषंघाने कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणेकरीता अपर पोलीस अधिक्षक सह आम्ही स्वत: दिनांक 09.04.2022 रोजी 16.00 वा जिल्हास्तरीय शांतता समिती
संवाद व आढावा बैठक घेउन महत्वाच्या सुचना दिल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी यांनी अदयाप पावेतो 50 मुख्य मिरवणुक मार्गाची आणि 200 इतर मिरवणुक मार्गाची पाहणी केली


आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अनुषंघाने अवैध धंदयांवर कारवाई मोहीम अंतर्गत अवैध विनापरवाना दारू च्या एकुण 100 केसेस, गुटख्याच्या एकुण 21 केसेस, जुगार च्या एकुण 36 केसेस अदयाप पावेतो करण्यात आलेल्या आहेत. अवैध धंदयांविरुदध मोहीम अदयाप सुरु आहे. वाशिम जिल्हा जातीय दृष्टया संवेदनशील आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती उत्सव निमित्त जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होउ नये या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन अदयाप पावेतो 148 इसमांवर कलम 107 सी. आर. पी. सी. प्रमाणे, एकुण 26 इसमाविरूदध कलम 110 सी. आर. पी. सी.प्रमाणे, एकुण 275 इसमाविरूदध कलम 144 (1) (2) सी. आर. पी. सी. प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी एकुण 15 जातीय दृष्टया संवेदनशील गावांना, पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी एकुण 58 जातीय दृष्टया संवेदनशील गावांना आणि दुय्यम अधिकारी यांनी एकुण 52 जातीय दृष्टया संवेदनशील गावांना भेटी देउन लोकांसोबत समन्वय साधला आहे.

पोलीस दलाच्या वतीने 03 पोलीस उपअधिक्षक, 15 पोलीस निरीक्षक, 50 सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, 700 पोलीस अंमलदार, 02 एस. आर. पी. एफ. प्लॅटुन, 02 आर. सी. पी. पथक, 02 क्यु. आर. टी. पथक, 350 होमगार्ड इतका बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. उत्सव दरम्यान शांततेचा भंग केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. डॉ.बाबासाहेब जयंती आणि महाविर जयंती उत्सव दरम्यान वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्वांना शांततेचे आवाहन करण्यात येत आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!