पुणे वार्ता:- दिनांक १०/०४/२०२२ रोजी पोलीस उप निरीक्षक सुरज किरण गोरे सह लोणीकंद तपास पथक पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना पाहवा / बाळासाहेब सकाटे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, दोन इसम हे गावठी कट्टे विक्री करीता लिबर्टी बेकरी जवळ कोलवडी, केसनंद थेऊर रोड येथे येणार आहेत. सदर बातमीवरून पोउपनि सुरज गोरे यांनी सदर बातमीचा आशय मा. वपोनि सो यांना कळवून तपास पथकातील पोहवा बाळासाहेब सकाटे, पोलीस अंमलदार साई रोकडे, दिपक कोकरे, बाळासाहेब तनपुरे, पांडुरंग माने यांचे सह लागलीच रवाना होऊन लिबर्टी बेकरी जवळ, केसनंद थेऊर रोड येथे सापळा लाऊन बसलो
असता दिनांक १०/०४/२०२२ रोजी २०/१५ वा. चे सुमारास बातमीप्रमाणे दोन इसम संशयितरित्या लिबर्टी बेकरीसमोरील रोडवर आढळुन आलेने स्टाफच्या मदतीने त्यांना ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १) महेश तानाजी घोगरे, वय २८ वर्षे, रा. संतोष नगर, पाण्याचे टाकीजवळ, नजर प्लाझा, कात्रज, पुणे, मुळ रा.मु.पो.आर्वी, वडाची वाडी ता हवेली, जि पुणे २) मंजय रामचंद्रप्रसाद साह, वय ३८ वर्षे, रा. भोसरी, सदगुरू नगर, पुणे मुळ रा. जियान, थाना, मुफसील, ता. जि. शिवान, रा. बिहार असे असल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता क्र १ याचे शर्टाचे खाली कंबरेला डावे बाजुस एक सिल्वर रंगाचे गावठी पिस्तुल मिळून आले व त्याचे पॅन्टचे खिशात तीन जिवंत काडतुसे मिळून आले. तसेच क्र.२ याचे शटचि खाली कंबरेला डावे बाजुस एक सिल्वर रंगाचे गावठी पिस्तुल मिळून आले व त्याचे पॅन्टचे खिशात तीन जिवंत काडतुसे मिळून आले.
