बातमी संकलन – महेश बुंदे
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती संलग्नित भारतीय महाविद्यालय अमरावती येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर “समतापर्व जनजागृती अभियान” अंतर्गत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती, शहरांमध्ये रॅली, शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या महात्मा ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजना, छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना अशा महामानवांच्या नावाने समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना समाजातील सर्व घटकांना माहिती व्हावी. या दृष्टिकोनातून समतापर्व सप्ताहामध्ये पथनाट्याच्या माध्यमातून अमरावती शहरातील राजापेठ, शारदा नगर, गोपाल नगर, अंबादेवी रोड सोबतच शहरातील मागास भागांमध्ये पथनाट्य सादर करून रॅली काढून महाविद्यालयाच्या वतीने जनजागृतीपर छोटासा प्रयत्न करण्यात आला.
