मुर्तिजापूर: तालुक्यातील पारद गावामध्ये जेतवण बुध्द विहारात क्रांती सुर्य जोतीराव फुले यांची जयंती मोठया उत्साहात रमाई संघाच्या वतीने साजरी करण्यात आली. कार्य क्रमाचे अध्यक्षा अन्नपुर्णा बाई गवई होत्या. त्यांनी पुष्प हार टाकून , आदरांजली वाहिली. कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंच शिलाने करण्यात आली.
कार्यक्रमाला संबोधन करतांना पत्रकार प्रेमकुमार गवई यांनी महात्मा फुलेंचे कार्य अजरामर आहे. निःस्वार्थी पने फुले कुटुंबाने कार्य केले. पण दुर्दैव आज सुद्धा भारत सरकारने भारत रत्न पुरस्कार दिला नाही.ही जयंती पर्वावर खेद व्यक्त केला. कार्यक्रमाला संबोधन करतांना संघर्षा ढोके इने विवीध विषयावर प्रकाश टाकला.तर ज्योतिबा फुले यांची गीते प्रेमिला ताई ढोके, अन्नपुर्णा गवई, ज्योती धंदर समस्त उपासिकांनी प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाला उपस्थित मिलिंद गवई, वासुदेवराव गवई, बोद्धचार्य आनंद धंदर , मैनाबाई गवई,नंदा बाई गवई, स्वाती इंगळे, सविता वाकोडे, वनमाला वाकोडे, इंदुबाई गवई, शांताबाई गवई, सुजाता गवई, ज्योती धंदर , प्रेमीला ढोके, संघर्षा ढोके,अन्नपुर्णा गवई, सुनंदा खंडारे, कुसुम प्रभे कमला प्रभे व समस्त उपसिका संघ उपस्थीत होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रेमकुमार गवई यांनी केले.तर आभार प्रदर्शन स्वातीताई इंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे योगदान होते.