चाकण: मेदनकरवाडी गावात पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेदनकरवाडी गावातील आनंद हायट्स बिल्डिंगमध्ये हनुमंत भिकाजी मेदनकर यांच्या रूममध्ये मागील सहा महिन्यांपासून सातारा येथील आरोपी सचिन रंगनाथ काळेत(वय-३३) व त्याची पत्नी आश्विनी सचिन काळेत(वय अंदाजे-२३) (सध्या रा. मेदनकरवाडी, बापदेव वस्ती, चाकण, ता खेड, जि. पुणे, मूळ रा. ता. माण ,जि.सातारा) हे कुटुंब आपल्या मुलांसह चाकण मेदनकारवाडी येथे राहत होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी सचिन काळेत आपल्या पत्नीवर बाहेर कुठे तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत असल्याने त्यांच्यात भांडण होऊन १२ एप्रिल २०२२ रोजी पहाटे सचिन काळेत याने पत्नीचा चाकूने भोकसून निर्घृण खून केला.

या घटनेनंतर आरोपी पती सचिन काळेत घडलेल्या घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा गुन्हे शाखा युनिट ३ व चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
