चाकण:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीच्या निमीत्ताने दि. १३/०४/२०२२ रोजी चाकण-तळेगाव चौक ते राजगुरुनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया पर्यंत रॅली आयोजित करण्यात आली आहे.
म्हणून आज दि. 11 एप्रिल रोजी चाकण पोलीस स्टेशनला निवेदन सादर करण्यात आले की दि. १४/०४/२०२२ रोजी महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमीत्ताने दि. १३/०४/२०२२ रोजी आम्ही रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) पक्षाच्या व्यापारी आघाडी, वाहतुक आघाडी, कामगार आघाडी, महीला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वर नमुद मार्गावर संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. की, सदर रॅली मध्ये चार चाकी, तीन चाकी, दुचाकी असा सुमारे १०० ते २०० गाडया सहभागी होणार आहेत.
