दर्यापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील भारनियमन त्वरित बंद करण्यासाठी शिवसेना आक्रमक, १४ एप्रिल पर्यंत भारनियमन बंद न केल्यास तीव्र आंदोलन

दर्यापूर – महेश बुंदे

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ दर्यापूर तर्फे दर्यापूर तालुक्यातील ग्रामीण भागात एमरजन्सी हा निकष लावून कनिष्ठ अभियंता यांनी रात्रीचे ग्रामीण भागात भारनियमन सुरू केले रात्रीच्या वेळी लाईट गेल्यावर लहान मुले मुली,वयस्कर , म्हातारे , छोटेमोठे आजार असलेले व्यक्ती घरात असतात व या कडाकाच्या वातावरणाच्या तापमानात लाईट जर नसले तर त्यांची परिस्थिती कशी होत असेल याचा विचार न केलेलाच बरा म्हणून या सर्व बाबीचा विचार करून शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक घेऊन तात्काळ कनिष्ठ अभियंता श्री मोहोकार यांची भेट घेतली

व त्यांना या बाबतीत जाब विचारला त्यावर त्यांनी आम्हाला वरून मेसेज येतो त्याप्रमाणे आम्ही लाईन बंद करतो असे सांगितले परंतु गोपाल पाटील अरबट यांनी आक्रमक पवित्रा घेतला व रात्रीचे भारनियमन बंद झालेच पाहिजे असे ठणकावून सांगितले त्यावर श्री मोहोकार यांनी विनंती करून त्यांनी सांगितले की आमच्या हाती काही नाही आम्हाला वरून महावितरण कंपनी चे प्रमुख श्री विजय सिंघळ हे आदेश देतात ते आदेश आम्ही पाळतो पण यावर शिवसेना तालुका प्रमुख यांचे समाधान झाले नाही व त्यांनी १४ एप्रिल पर्यंत जर ग्रामीण भागात रात्रीचे भारनियमन बंद केले नाही तर शिवसेना तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगितले .

त्यावेळी गोपाल पाटील अरबट, बबन विल्हेकर, योगेश बुंदे, सचिन कोरडे, विजय तळोकार, कमलेश वानखडे, शुभम पतींगे, खंडू राऊत, शत्रूघून नेहर ,अक्षय गावडे ,निलेश पारडे, नागेश काबे,शरद अरबट एकनाथ अरबट बंडू कोकने विलास साखरे, इत्यादी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!