आख्खा संसार जळून खाक झाला अन् होत्याच नव्हत झालं,रामुशेठ मालपाणी यांनी धीर देत केली तातडीची मदत

दर्यापूर – महेश बुंदे

मध्यरात्रीला विटा मातीच्या घराने पेट घेतला अन् होत्याच नव्हत झालं, आख्खा संसार जळून खाक झाला. अंगावरच्या कपड्याने त्यांचा संसार रस्त्यावर आला होता. विहिगाव (ता. अंजनगाव सुर्जी) ललिता वानखडे यांचे राहते घर आगीच्या भस्मसात पडले. अशावेळी दर्यापूर येथील कौसल्याबाई निवारा ट्रस्टचे अध्यक्ष रामुशेठ मालपाणी यांच्याकडून महिलांनी मदतीचा हात दिल्यावर पुन्हा या कुटूंबाला संसार उभे करण्याचे बळ मिळणार आहे. त्यांच्या या मदतीने मानवतेचे दर्शन घडले आहे.

अंजनगाव तालुक्यातील विहिगाव येथे ललिता वानखडे हे वास्तव्य करून राहतात. रात्री तीनच्या सुमारास विटा मातीच्या घराने पेट घेतला. सुरवातीला कुठे आग लागली कळाली नाही. परंतु, आगीने अधिक पेट घेतल्यावर या कुटूंबाला जाग आली. त्यावेळी आरडाओरडा करून परीसरातील ग्रामस्थांना मदतीला बोलवले. त्यावेळी परीसरातील लोकांनी आग आटोक्यात आणली. यामध्ये या कुटूंबाचे सर्वकाही जळून खाक झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीच जीवीतहानी झाली नाही. या बाबत माहिती मिळताच ग्रामस्थांनी या कुटूंबाला मदतीचा हात दिला आहे.

दर्यापूर येथील रामुशेठ मालपाणी यांना कुटूंबांचे घर जळाल्याची माहिती मिळाली. त्यांनी या कुटूंबासाठी धान्य, संसारउपयोगी भांडी व कपडे मदत दिली आहे. त्यासोबतच करुणा ढवळे ग्रामसेविका पंचायत समिती अमरावती, राम सराड ग्रामसेवक पंचायत समिती अंजनगाव सुर्जी, राजेश उगले विहिगाव ग्रामसेवक पंचायत समिती, अंजनगाव सुर्जी यावेळी गटविकास अधिकारी, आमदार बळवंत वानखडे मित्र परिवार, सरपंच जयश्री पोटदुखे, नामदेव उटाळे, विनोद खेडकर, गणेश विल्हेकर, अनिल वानखडे, कण्हेया बुंदीले, निलेश वानखडे, चरन बारब्दे, संजय कुलट, नंदकिशोर सोनी, पप्पू मिर्झा, निलेश कुलट, गणेश मोरे, राजू राऊत, महेश बुंदे यांच्यासह गावकरी उपस्थीत होत्या. तातडीने समाजसेवकांनी या कुटूंबाला मदत दिल्याने आधार मिळाला आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!