चिंबळी कुरुळी परिसरात रामनवमी उत्सव साजरी

चिंबळी दि १०(वार्ताहर – सुनील बटवाल) :- खेड तालुक्यातील दक्षिण भागातील चिंबळी कुरुळी परिसरात रामनवमी उत्सव साजरी करण्यात आली. चिंबळी (पद्मावती नगर) मध्ये सावता महाराज मंदिरात रामनवमी निमित्ताने हे भ प‌ वैभव महाराज शेंडे यांची किर्तन सेवा व रामजन्माचा पाळणा  आयोजित करून महाप्रसाद संगित भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ व पद्मावती भजनी मंडळ व पद्मावती तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले होते यावेळी बाजार समितीचे संचालक पांडूरंग बनकर उपसंरपच चेतन बर्गे तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष व माजी उपसरपंच विश्वास बर्गे सदस्य काळूराम बनकर ह भ प एकनाथ बनकर सुभाष कातोरे  ज्ञानेश्रर बनकर सोपान ताम्हाणे कुंडलीक बनकर हिरामण गवळी श्रीकांत बनकर अक्षय जगनाडे शाम बहिरट महेंद्र जगनाडे आदि मान्यवरांसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .

त्याप्रमाणे चाकण कुरुळी मोई निघोजे‌ केळगाव मरकळ सोळू धानोरे चल्होरी खु मोशी परिसरात रामनवमी निमित्ताने किर्तन सेवा व रामजन्माचे किर्तन व पाळणा आयोजित करून मोठ्या उत्साहात रामनवमी उत्सव साजरा करण्यात आली

 
चिबळी येथील सावता महाराज मंदिरात रामनवमी निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या किर्तन सेवेत ह भ प वैभव महाराज शेंडे व उपस्थित मान्यवर

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!