चाकण: खराबवाडी गावचे माजी पोलीस पाटील किरण किर्ते यांचा रामनवमीच्या मुहूर्तावर खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे भविष्यातील खराबवाडी गावातील राजकीय गणितात मोठे बदल होणार असल्याची चर्चा गावात सुरू झाली आहे.
किरण किर्ते यांचा खराबवाडी गावातील पोलीस पाटील पदाचा कार्यकाळ बघता त्यांनी पदाला साजेशे असे काम केले आहे. पण काही राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार की दुसऱ्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार यावर गावात उलट सुलट चर्चाना उधाण आले होते. पण आज अखेर रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतल्याने नक्कीच खराबवाडी गावात व परिसरात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळणार आहे.
