आदर्श हायस्कूल येथे २० एप्रिल पासून ग्रीष्मकालिन कला,क्रीडा व सांस्कृतिक शिबीर

दर्यापूर – महेश बुंदे

श्री शिवाजी शिक्षण संस्था,द्वारा संचालित आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दर्यापूर व जिल्हाक्रीडा अधिकारी कार्यालय,अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० एप्रिल तव २९ एप्रिल दरम्यान ग्रीष्मकालिन कला,क्रीडा व सांस्कृतिक शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मुले व मुली करिता,क्रिकेट,व्हॉलीबॉल, संगणक, योगा, थ्रो बॉल, बुद्धिबळ,बॅटबिटन, एरोबिक्स, चित्रकला(वारली पेंटिंग),नृत्य या क्रीडा व कला कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.तसेच इंग्रजी व गणित विषयाचे मार्गदर्शन या शिबिरादरम्यान करण्यात येणार आहे.


या शिबिराची वेळ सकाळी साडेसात ते साडेनऊ असून प्रवेश फी १०० आहे, तरी या शिबिराचा विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकमहाविद्यालयाचे.प्राचार्य.जी.एम.गौरखेडे,उपमुख्याध्यापिका के.आर.घाटे यांनी केले आहे व अधिक माहितीकरिता एस बी खाडे मो.9665233127,उमा बुंदीले-मो.7588084503, अनिल भारसाकळे- मो.9421786205 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,दर्यापूर यांच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!