संपुर्ण महाराष्ट्रात वाशिम जिल्हयाची Best Unit in Welfare Activities सर्वोत्कृष्ट पोलीस घटक म्हणुन निवड

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे मार्गदर्शनात राज्यातील पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हयाचा तपास त्याचप्रमाणे कायदा व सुव्यस्था राखण्याच्या संबंधित पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना प्रोत्साहित करणे इत्यादी हेतु साध्य करण्यासाठी सर्वोत्कृष्ट पोलीस पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

दिनांक ०८/०४/२०२२ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे परिषदेमध्ये संपुर्ण महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट घटक( Best Unit in Welfare Activities ) म्हणुन वाशिम जिल्हयाची निवड करण्यात आली असुन, मा.श्री दिलिप वळसे पाटील गृह मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन मा.श्री बच्चन सिंह पोलीस अधीक्षक वाशिम यांचा गौरव करण्यात आला वाशिम जिल्हा पोलीस दलाचे अस्थापनेवर १५०० पेक्षा जास्त अधिकारी/अंमलदार कार्यरत असुन पोलीस कल्याण निधी अंतर्गत येणाऱ्या सर्व सेवांचा लाभ घेत आहेत. यासाठी मागील सर्व पोलीस अधिक्षक मा. श्रीमती मोक्षदा पाटील यांनी वेलफेअर मध्ये जास्तीत जास्त निधी उपलब्ध होण्याकरीता पोलीस पेट्रोल पंप सुरु करण्याची संकल्पना मांडुन शासनास प्रस्ताव सादर केले.

तत्कालीन रुजु झालेले पोलीस अधिक्षक श्री.वसंत परदेशी यांचे संकल्पनेतुन, पोलीस कल्याण निधी उपकमाअंतर्गत सबसीडीअरी कॅन्टीन सर्वाकर्षपणे मॉल पॅटर्न करुन दिली. पोलीस वसाहतीत दुकानासाठी गाळे,किडा,वैद्यकिय अग्रीम,कोबीड.१९अग्रीम, उच्चशिक्षण स्कॉलरशीप,शैक्षणिक कर्ज,गर्भवती अनुदान सदृढ बालिका अनुदान, सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचा सत्कार,अनुकंपा तत्वावर नियुक्ती यासारखे उपक्रमाची पायाभरणी करुन सुरवात केले.मा. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह हे २०.९.२०२१ पासून वाशिम पोलीस दलात हजर झाले. पोलीस कल्याण निधी अंतर्गत विविध उपक्रमांचा आढावा घेऊन यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी सुरु केलेले उपक्रम तसेच पुढे घेऊन जाण्याचे काम तसेच नव्याने नवनवीन उपक्रम राबविण्याचा चंग बांधला आहे.मा.श्री.चंद्रकिशोर मीना पोलीस उप महानिरिक्षक अमरावती परिक्षेत्र, अमरावती यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस अधीक्षक वाशिम यांनी नव्याने हजर झाल्यानंतर दिवाळी सणा निमित्त दिवाळी फराळ वाटप,पोलीस अंमलदार यांचे प्रमोशन,समाधान हेल्प लाईन, स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अशा सारखे उपक्रम उत्कृष्ट पध्दतीने कार्यान्वित राहतील याचेवर भर दिला. पोलीस खात्यात नोकरी करीत असताना ताणतणाव कमी व्हावा तसेच नोकरी आणि घर याचे संतुलन ठेवण्याकरीता पोलीस अंमलदार यांचे कुटुंबियांकरीता संवाद व मार्गदर्शन शिबीर आयोजित केले, महिलांना नोकरी आणि घर हया दोन्ही गोष्टी तितक्याच प्राधानान्याने सांभाळाव्या लागतात, जागतिक महिला दिनाचे अनुषंगाने महिला अधिकारी/ अंमलदार यांचे करीता झुम्बा डान्स चे आयोजन आपले आरोग्य सांभाळण्याकरीता लक्ष दिले पाहिजे याची जाणीव करुन दिली.

त्याच दिवशी भागश्री बल्लाळ
सारख्या महिलांना त्यांच्या कार्यशैलीबददल गौरविण्यात आले.पोलीस कल्याण शाखेत पोलीस निरीक्षक शेळके,सफो गोडाम,मपोह बेबी राठोड,मपोशि राणी तायडे,प्रविण शिरसाट तसेच वेलफेअर शाखा क्लार्क श्रीमती गायकवाड यांचे तसेच वाशिम जिल्हयातील सर्व अधिकारी/अंमलदार यांचे कौतुक करुन तुमच्या सगळण्यांचे सहकार्यानेच हे स्मृतीचिन्ह वाशिम जिल्हयास प्राप्त झाले असुन पोलीस कल्याण निधी अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या योजनांचा जास्तीत जास्त पोलीस अधिकारी/अंमलदार यांना लाभ घ्यावा याकरीता सर्वोतोपरी पर्यंत करणार असल्याची ग्वाही मा.पोलीस अधीक्षक वाशिम यांनी दिली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!