प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-दिनांक 14.04.2022 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव संपुर्ण जिल्हयात साजरा करण्यात येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणेकरीता तसेच शांततेत उत्सव साजरा व्हावा या उददेशाने पोलीस अधिक्षक कार्यालय वाशिम येथे मा पोलीस अधिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 09.04.2022 रोजी 16.00 वा जिल्हास्तरीय शांतता समिती संवाद व आढावा बैठक पार पडली. सदर मिटींग करीता जिल्हयातील विविध भागातुन 150 च्या वर मान्यवर ऊपस्थित होते.

सर्वप्रथम मा अपर पोलीस अधिक्षक वाशिम यांनी सर्व उपस्थित मान्यवर यांना संबोधित केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमीत्त शासनाचे निर्देशांबाबत माहिती दिली. सर्वांनी शांततेत उत्सव साजरा करावा. पारंपारीक मार्गांनीच मिरवणुक काढावी. इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. उपस्थित लोकांनी जयंती उत्सव साजरा करतांना निर्माण होणारे प्रश्न मांडले. त्यामध्ये मुख्य प्रश्न डी.जे. वाजविण्याच्या परवानगी बाबत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देतांना पोलीस अधिक्षक यांनी डी. जे. वाजविणेवर उच्च न्यायालयाची बंदी असल्याबाबत सांगितले.पोलीस अधिक्षक यांनी जिल्हयात अलीकडील काळात घडलेल्या मुख्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या जातीय दंगलीच्या घटनांबाबत माहिती दिली. कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण करणाऱ्यांच्या विरूदध कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
