जुन्या दर्यापूरतील दाशरथी श्रीराम मंदिरात गुढीपाडव्यापासून सुरू झालेला राम जन्मोत्सव नवरात्र सोहळा अंतिम टप्प्यात आला असून रविवारी होणाऱ्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
यंदा वर्धा येथील ह भ प श्रीराम काळे यांनी कीर्तन सेवा दिली आहे या रामजन्मोत्सव सोहळ्याला खूप वर्षांची परंपरा आहे दररोज सकाळी श्रीरामाची महाआरती हरिपाठ भजन व सायंकाळी किर्तन अशा कार्यक्रमांनी गेले नऊ दिवस दर्यापूरकर नागरिक भक्तिरसात रंगून गेले आहेत दशरथ ती श्री राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्री राम कथा कीर्तन स्वरूपात सादर केली जाते विशेष म्हणजे नारद कीर्तन परंपरा वर आधारित ही कीर्तन सेवा असते , वर्धा येथील श्रीराम बुवा काळे हे नारदीय कीर्तन परंपरे मधील श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व आहेत त्यांना या किर्तन सेवेत अनेक पारितोषिकांनी विभूषित करण्यात आले आहे .
रविवारी श्रीराम जन्मोत्सव सोहळा सकाळी साडेदहा वाजता सुरु होणार असून बारा वाजता श्रीराम जन्म होणार आहे यानंतर गोपाळकाला आयोजित करण्यात आला आहे दर्यापूर व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी राम जन्मोत्सव सोहळ्यात उपस्थित रहावे असे आवाहन दाशरथी श्रीराम मंदिराच्या पंच कमिटीने केले आहे.