काळाची गरज – “वृक्षसंवर्धन एक जबाबदारी”

प्रतिनिधी फुलचंद भगत

“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरें ।”
म्हणजे वृक्ष हे आपली मित्र असतात, असे राष्ट्र संत तुकाराम महाराज आम्हाला सांगून गेले। परंतु हल्लीच्या आधुनिकतेच्या काळात मनुष्य आधुनिकतेकडे एवढा ओढला जात आहे की त्याला या मित्राच भान देखील राहल नाहीय. वृक्ष मात्र वर्षानुवर्षे प्राणवायू देऊन आणि बदल्यात कॅरबंडाय ऑक्सिडं शोषून त्यांच्या प्रिय मित्राचे प्राण वाचवतच आहेत. अगदी लहानपण पासून तर म्हातारपणाच्या काठी पर्यंत वृक्ष आपल्याला आधार देतात तेही कुठल्या गोष्टीची अपेक्षा न करता.

निसर्गसृष्टी म्हणजे मानवी जीवनाला लाभलेले अमृत वरदान, जी पृथ्वीचा ही एक मोलाचा दागिना आहेच. परंतु हल्ली याच दागिन्याला मानवाची नजर लागून तो दागिना आता खंडत चालला आहे आणि याचा संकेत आपली पृथ्वी आपल्याला दरवर्षी पावसाळी ऋतूतील अनियमितता, त्याचे घटते प्रमाण, आणि उन्हाळ्यात कमालीच्या प्रकोपद्वारे दाखवते, तरी मानवाला मात्र याची जाणीव होत नाही.

“झाडे लावा, झाडे जगवा” या संकल्पनेतील जेवढा भर आपण झाडे लावण्यावर देतो तेवढा मात्र लोकांचा झाडे जगावण्यावर काहीसा दिसत नाही. पावसाळ्यात “वृक्षरोपण” याला आपण जेवढे महत्व देतो तेवढेच महत्व उन्हाळ्यात “वृक्ष संवर्धनाला” देखील दिले पाहिजे. पावसाळ्याच्या सुरवातीला शासनाद्वारे किंवा खाजगी संस्थेद्वारे कोट्यवधी झाडे लावली जातात परंतु लावलेल्या झाडाची निघा कुणी राखत नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे आणि वाढत्या उन्हाच्या तापामुळे कोट्यवधी मधले अर्धे झाडे जळून खाक होतात.

या वाढत्या तापमानात आपण वृक्षांची काळजी घेणे ही आपली एक जबाबदारी आहे. नियमित प्रमाणे जास्त नाही पण थोडे पाणी देऊन मोठे केले तर पुढच्या पिढीला ते मोलाच योगदान देतील यात काही संशय नाहीच. आजच्या युवकाला हे महत्व पटऊन देने अगदी तेवढेच महत्वाचे आहे जेवढे पालक त्यांच्या पाल्याची शैक्षणिक जीवनाची आणि नोकरीची काळजी करतात. आज या युवकाने ही जबाबदार चोखपणे पार पडली तरच त्याला पुढचे जीवन पाहायला मिळेल. शाळा, महाविद्यालये यात दिलेली शिकवण न विसरता या समाजाचे आणि सृष्टीचे ऋण या नवं युआवकांने फेडावे व वृक्ष संवर्धनास आपला मोलाचा वाटा द्यावा. आजचा युवक हा ऊर्जेचा एक स्रोत असून त्याने आजचे काळाचे वाढते प्रश्न समजून आपले ज्ञान व ऊर्जा याचा योग्य वापर करणे गरजेचे वाटते. जर युवकांनी आज या बदलात मोलाचा वाटा दाखवला तर येत्या काही वर्षातच आपण या पृथ्वीला तिचा निसर्गसृष्टीचा मौल्यवान हरित दागिना परत करू शकू.

मयुर पाटील
सचिव – यंग सिटीझन फोरम

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!