अमरावती प्रतिनिधी – महेश बुंदे
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित भारतीय महाविद्यालय अमरावती येथील राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभागाद्वारे आयोजित नागरिकांची जबाबदारी या विषयवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आराधना वैद्य, प्रमुख वक्ते डॉ.बबिता येवले राज्यशास्त्र विभाग, प्रमुख महात्मा फुले महाविद्यालय अमरावती
प्रमूख उपस्थिती डॉ.प्रशांत विघे राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, डॉ. स्नेहा जोशी महिला कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना विचारपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय करून देताना डॉ. प्रशांत विघे म्हणाले की, भारतीय संविधान २६ जानेवारी १९५० ला अमलात आल्यानंतर नागरिक म्हणून संविधानाचा भाग २ कलम ५ ते ११ मध्ये नागरिकत्वाच्या तरतुदीचा समावेश करण्यात आलेला आहे. नागरिक म्हणून मिळालेला अधिकार लोकशाही प्रगल्भ करण्याच्या दृष्टीने महत्वाचे असून ती जबाबदारी तरुणांच्या आहे असे मत व्यक्त केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आराधना वैद्य म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी आपण भारतीय नागरिक म्हणून न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतावर चालणाऱ्या लोकशाहीतील संविधानिक मूल्य जोपासली पाहिजे. सोबतच भारतीय संविधानातील मुलभूत अधिकारासोबत कर्तव्याची जाणीव नागरिकांमध्ये निर्माण झाली पाहिजे असे प्रतिपादन केले.
