किरकोळ वादातून खराबवाडीत एकाचा खून… परिसरात उडाली खळबळ…

चाकण: खराबवाडी गावातील केसवड वस्तीवर किरकोळ वादातून एका परप्रांतीय शिवम कैलासनारायण यादव(वय-२३,मूळगाव-रेवन, तहसील-मौराणीपूर,जि.झाशी, राज्य- उत्तेरप्रदेश)या तरुणाचा खून झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ऐन खराबवाडी गावच्या यात्रेच्या अगोदरच्या रात्री हा खून झाल्याने या घटनेची चाकण परिसरात मोठी चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाळुंगे पोलीस चौकीत पुष्पेद्रसिंग बलरामसिंग परिहार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार मित्र (मयत सह)चाकण औद्योगिक वसाहतीतील व्यंकटेश ऑटोपार्टस या कंपनीमध्ये नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. वरील चार मित्रांच्या बरोबर त्याच कंपनीत अर्जुन रामलखन यादव(सध्या रा.केसवड वस्ती) रेकॉर्ड कंपनीच्या पाठीमागे खराबवाडी, ता.खेड,जि.पुणे येथे भाड्याने राहत होता. तो मूळचा उत्तरप्रदेश येथील रहिवासी आहे.

अर्जुन यादव व वरील चार मित्र एकाच कंपनीत काम करत असल्याने त्यांच्यात मैत्री प्रस्थापित झाली होती. फिर्यादिने दिलेल्या माहितीनुसार आरोपी अर्जुन यादव त्याच्या रूम्पवर पार्टी देणार असल्याचे मला त्याने सांगितले. मी माझ्या मित्रास तू रूम वर येणार आहे का? असे विचारतास मी उद्या सकाळी रूम वर येणार असल्याचे सांगितले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार मी जेव्हा रूमवर आलो त्यावेळी माझे मित्र सौरभ यादव व शिवम यादव असे दोघे जण अगोदरच रूमवर आले होते. जेवण करण्यासाठी लागणार भाजीपाला आणण्यासाठी मी स्वतः तसेच सौरभ यादव व शिवम यादव वाघजाईनगर येथे होऊन भाजीपाला आणला.

रात्री ९:३५ वाजताच्या सुमारास मी तसेच सौरभ यादव व शिवम यादव असे अर्जुनच्या रूमवर पार्टी करीत असताना मी पार्टीवेळी दारू पिल्याने अर्जुन यादव याने मी दारू पिलो म्हणून माझेशी वाद करून मला शिवीगाळ करून मला रूमच्या बाहेर काढले. मी अर्जुन यादव यांच्या बिल्डिंगचे खाली थांबलेलो असून आपल्या रुमकडे येणारा रस्ता माहीत नसल्याने तू मला घ्यायला ये असे मला सांगितले. सदर प्रकार मी माझे मित्र सौरभ यादव व शिवम यादव यांना सांगितला. यानंतर आम्ही तिघे जण मित्र धर्मेंद्रसिंग यास घेण्यासाठी अर्जुन यादव याचे बिल्डिंग खाली आलो. पुढे अर्जुन यादव याने मित्र धर्मेंद्रसिंग याला पार्टी देण्याकरिता त्याचे रूमवर नेऊन पार्टीवेळी धर्मेंद्रसिंग याने दारू पिल्याने त्यास शिवीगाळ करून रूममधून बाहेर काढले असल्याचे सदर बाबत जाब विचारणे करिता मी बिल्डिंग मधील दुसऱ्या मजल्यावरील अर्जुनच्या रूमवर गेलो. त्यास घडलेल्या घटनेबाबत जाब विचारला असता तो आमच्याशी देखील वाद करू लागला. जास्त वाद नको म्हणून आम्ही तेथून निघून आमच्या रूमवर जावू लागलो आम्ही बिल्डिंगचे जिने उतरून खाली येत असताना अर्जुन यादव आम्हाला मोठमोठ्याने शिवीगाळ करून पाठीमागे या तुमच्याकडे बघतो असे बोलू लागला.

भांडण नको म्हणून आम्ही अर्जुन यादव याच्या बोलण्याकडे लक्ष न देता आमच्या रूमकडे जाऊ लागलो. आम्ही अनिकेत केसवड यांच्या बैठे भाड्याचे खोल्याच्या जवळ आलो असताना अर्जुन यादव हा पुढील बाजूकडून त्याच्या हातात एक चाकू घेऊन आमच्याकडे जोरात पळत येताना दिसला. पुढे जास्त वाद वाढू नये म्हणून शिवम यादव याने तुम्ही मागे थांबा मी अर्जुन यादवला थांबवतो असे आम्हाला सांगितले. त्यानंतर शिवम यादव हा अर्जुन यादव याला थांबविण्यासाठी आडवा गेला. तसे अर्जुन यादव याने हातातील चाकू शिवम यादव याच्या छातीत भोकसला व तो पुन्हा पाठीमागे पळून गेला. यानंतर शिवम यादव खाली पडला व त्याच्या छातीतून रक्त येऊ लागले. आम्ही तातडीने त्याला चाकण येथील युनिकेअर येथे नेले तेथून पुन्हा आम्ही त्याला चाकण ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी शिवमला तपासून मयत असल्याचे सांगितले.

सदर वरील घटनेनुसार फिर्यादीने फिर्याद नोंदवली त्यानुसार आरोपी अर्जुन यादव याच्यावर चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५०९/२०२२ भादवि कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास महाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर, पोलीस उपनिरीक्षक किरण शिंदे, तपास पथकाचे अंमलदार अमोल बोराटे, बिराजदार, संतोष काळे,हवालदार कोणकेरी, पो.न. आटोळे पथक करीत आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!