प्रतिनिधी आकाश वरघट
अमरावती वार्ता:-राजुरा ग्रामपंचायत सदस्य, भुषण काळे तसेच, गट्टू भाऊ पाटील, व शिवसेनेचे तालुकाध्यक्ष,राजू भाऊ निंबरते,प्रशांत पाटील, कालमेघ लक्ष्मण शेंडे, व समस्त ग्रामस्थ व नागरिक यांनी राजुरा येथील महावितरण ऑफिसला लाईन ला कंटाळून घेतली ऑफिस ची भेट, व भूषण काळे यांनी महावितरण वरिष्ठ अधिकारी यांना फोन केले होते फोन बंद दाखवत होते, नंबर नेहमी बंद राहतो असे नागरिकांचे म्हणणे आहे.आणि लोडशेडिंग सकाळी किव्हा सायंकाळी नियोजित असायला हवं आणि त्याची पूर्व कल्पना जनतेला माहीत असायलाच पाहिजे.
दिवसान दिवस लाईट च्या वेळेवर आलेल्या लोडशेडिंग च्या msg द्वारे होणाऱ्या त्रासाला कंटाळुन अनेक ग्रामस्थ धडकले महावितरण ऑफिसला ,तसेच नागरिक वेळेवर बिल भरत असल्याने, तरीसुद्धा लाईटचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होत आहे, लोड शेडिंग टाईम नियमानुसार नसून तसेच वेळे कधी पण येणे आणि कधी पण जाणे असं असून , नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास भोगावा लागत आहे, तसेच रात्रीला लाईट नसून लहान बाळ त्यांना या लाईट चा सामना करावा लागत आहे, व दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे पेपर सुरू असल्याने त्यांचा रात्रीचे लाईट नसल्याने अभ्यासक्रम पूर्णपणे करू शकत नाही .
त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे , तसेच राजुरा गावातील संपूर्ण नागरिकांनी लाईन ला कंटाळून सर्वजणांनी महावितरणकडे धाव घेतली, तसेच नागरिकांनी महावितरणकडे संपूर्ण मागणी केली. आम्हाला वेळेनुसार लाईन द्या, लाईन न मिळाल्यास आम्ही आंदोलन करू असा राजुरा गावातील अनेक गावातील नागरिकांनी महावितरण कडे इशारा केला.
,