दर्यापूर – महेश बुंदे
गेल्या काही दिवसापासून जीवन प्राधिकरनाचे कामकाज लोकहिताचे नाही असा आरोप करून येवदा येथील नकुल सोनटक्के नामक युवकाने (दि. ०८) सकाळी ११ वाजता दर्यापूरातील दिवाणी न्यायालय परिसरात असलेल्या जीवन प्राधिकरण विभागाच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा असफल प्रयत्न केला, विशेष म्हणजे या आंदोलनात या एकट्या युवकाच्या शिवाय कोणीही नागरीक सहभागी झाले नाही, प्रशासनाला कोणतेही पत्र नाही, केवळ फेसबुक वर आंदोलन बाबत पोस्ट केली होती, यासंबंधात जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी (दि.०७) दर्यापूर पोलिसांना या संबंधात पत्र दिले होते, दर्यापूर पोलीस या संबंधात अलर्ट होते, सदर युवक पाण्याच्या टाकीवर चढत असताना त्याला दर्यापूर पोलिसांनी ताब्यात घेतले व समज देऊन सोडून दिले.
