दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर तालुक्यात अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने सामाजिक कार्यकर्ता नकुल सोनटक्के यांनी आक्रमक होत (दि. ०८) शुक्रवारी येथील जीवन प्राधिकरणाच्या टाकीवर चढून निषेध आंदोलन केले. नागरिक व पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तब्बल तीन तासानंतर नकुल सोनटक्के पाण्याच्या टाकीवरून खाली उतरत प्रशासनाला सहकार्य केले, पण त्यांनी नागरिकांना पाणी द्यावे अशी अट ठेवण्यात आली.

ती पूर्ण न झाल्यास पुन्हा या पेक्षाही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिला. दर्यापूर तालुक्यात येणार्या येवदा व वडनेर गंगाई या भागात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हीच स्थिती संपूर्ण दर्यापूर तालुक्यात असल्याने येवदा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ता नकुल सोनटक्के यांनी दर्यापूर येथील जीवन प्राधिकरणाच्या टाकीवर चढून निषेध आंदोलन केले.

नागरिकांना पाणी द्या असे नारे त्यांनी दिले. यावर जीवन प्राधिकरणाचे अधिकारी तोडगा काढण्यास तयार झाल्याने नकुल सोनटक्के यांनी तब्बल तीन तासानंतर पाण्याच्या टाकीवरून खाली येत प्रशासनाला सहकार्याची तयारी दाखवली. पण नागरिकांना पाणी द्यावे अशी अट त्यांनी ठेवली. प्रशासनाने ती मान्य केल्यावर नकुल सोनटक्के यांनी माध्यमांशी संवाद साधला.
प्रतिक्रिया —-
तालुक्यातील जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी आपण सदैव लढत राहू, कोणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी त्या दबावाला घाबरणार नसल्याचा इशारा त्यांनी देत तालुक्यातील जनतेला पाणी न मिळाल्यास या पेक्षाही तीव्र आंदोलन उभे करू
नकुल सोनटक्के
सामाजिक कार्यकर्ते, येवदा