राजगुरूनगर वार्ता:- भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आज खेड भाजपा कार्यालयात सकाळी भारत मातेचे पूजन करून, ज्येष्ठांचा सन्मान करून, व सर्वांसमवेत केक कापून स्थापनादिन साजरा करण्यात आला.

तसेच ज्येष्ठांचे मार्गदर्शन, कार्यकर्त्यांना संबोधित करत भाजपच्या स्थापना दिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस. सर्व कार्यकर्त्यांसाठी आनंद आणि उत्साहाचा दिवस.आज या निमित्ताने प्रत्येक कार्यकर्त्याने भारतीय जनता पक्षाचा ध्वज आपल्या घरावर फडकवून भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या कामाला वंदन करण्याचा संकल्प आहे .त्या निमित्त आज अतुल भाऊ देशमुख यांच्या भाजपा संपर्क कार्यालय येथे भाजपाचा ध्वज लावून व वंदन करत अतुलभाऊ देशमुख व तालुकाध्यक्ष शांताराम भोसले यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भाजपा खेड तालुका भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आज खेड तालुक्यात उत्साहात व आनंदात संपन्न झाला यावेळी सकाळी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे भाजपा स्थापना दिनानिमित्त जनता,पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना मार्गदर्शन करत होते ते यावेळी सर्वांनी लाईव्ह मार्गदर्शन टीव्हीवर पदाधिकाऱ्यांनी पहिले. त्यानंतर खेड तालुका भारतीय जनता पार्टी चे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी त्यांचा सन्मान करून काही ठराविक पदाधिकाऱ्यांचे मनोगत यावेळी संपन्न झाले .
तसेच यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते अतुलभाऊ देशमुख, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष बाळासाहेब कहाने,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर, माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रेय सांडभोर, भारतीय जनता पार्टी जिल्हा सदस्य किशोर कुमठेकर, अनुसूचित जाति मोर्चा तालुकाध्यक्ष शहदेव तावरे,दीप्तीताई सांडभोर,तसेच महिला पदाधिकारी, सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
