चाकण: २०१३ – २०१४ साली भारतीय संरक्षण खात्याची INS विक्रांत हे जहाज भंगारात काढले जाणार होते त्यावेळी हे जहाज वाचवण्याच्या नावाखाली जनतेकडून गोळा केलेल्या ५७ कोटी रुपयांचा किरीट सोमय्याने घोटाळा करून देशाशी गद्दारी केली आहे. त्यामुळे किरीट सोमय्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी यासाठी खेड तालुका शिवसेनेच्या वतीने माणिक चौक चाकण येथे आंदोलन करून चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर बामणे यांना निवेदन दिले.
