प्रतिनिधी फुलचंद भगत :-
वाशिम:-मंगरुळपिर तहसील अंतर्गत येणाऱ्या पोटी मंडळातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणांत नुकसान झालेले असून ही शासनाने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईच्या यादीतून पोटी मंडळ वगळण्यात आले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड संतापाची लाट आहे.
मंडळ अधिकारी,तहसीलदार, एस डी ओ यांना वेळोवेळी निवेदन देऊनही त्यांनी या मंडळाचा समावेश नुकसानग्रस्त यादीत केला नाही. राज्याचे विरोधी पक्ष नेते मा.ना देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा या भागाचा दौरा केला आहे तरी सुद्धा या निगरग्गट्ट अधिकाऱ्यांनी व आंधळ्या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे असे दिसते म्हणून भाजप युवा मोर्च्या व किसान मोर्च्या यांच्या वतीने शेतकऱ्यांनी शिवणी रोड येथे रास्ता रोको आंदोलन केले आहे.
