अमरावती वार्ता :- समृद्धी महामार्गाच्या कामाने मार्गाच्या बाजूला गेलेल्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईन जेसीबी मशीनने खोदकाम करताना अनेक ठिकाणी फुटल्या आहेत. त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. तसेच अनेक ठिकाणी खोदकामामुळे शेतकऱ्यांचे शेताला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन फुटल्या आहेत.
पहा व्हिडिओ शेतकरी वर्ग
त्या दुरुस्त करून देण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. मात्र यासाठी कंपनी कडून त्वरित दुरुस्ती साठी कारवाई न करता शेतकऱ्यांकडून खोदकाम करून घेतल्या जात आहे.
या खोदकामाचा इतर व कामाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही,अशा तक्रारी संबंधित शेतकऱ्यांनी केले आहेत. तसेच अनेक ठिकाणी खोदकाम केलेल्या रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते बंद पडले आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्ग लगत च्या शेतामध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. त्यांना शेतातील पीक काढून आणण्यासाठी रस्त्याची नितांत गरज आहे, मात्र याबाबत कंपनीचे संबंधित कर्मचारी व अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. शेतकऱ्यांना वारंवार संबंधित कर्मचाऱ्यांकडे जावे लागत आहे. या कंपनीच्या कामावर शासन व प्रशासनाचे लक्ष असण्याची गरज आहे.
याबाबत त्वरीत कारवाई करण्याची व शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज असताना प्रशासन मूग गिळून गप्प बसत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष पसरला आहे.याबाबत त्वरित कारवाई करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी रमेशराव मरगळे, सुदामराव मरगळे,दिगंबर मरगळे, नरेंद्र रघुते या शेतकऱ्यांनी केली आहे.
रवि मारोटकर स्वराज्य वार्ता ब्युरो चीफ