आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्याविरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा शिवसेना जिल्हयाच्या वतीने पोलीस स्टेशनला तक्रार

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम – आयएनएस विक्रांत युध्दनौकेच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशाचा भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्याने घोटाळा करुन देशाची गद्दारी केली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना त्वरीत तुरुंगात टाका अशी मागणी शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. ७ एप्रिल रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली.


तक्रारीत नमूद आहे की, वर्ष २०१३ मध्ये आयएनएस विक्रांत युध्दनौका वाचविण्यासाठी किरीट सोमय्या यांनी मोहीम सुरु केली होती. केंद्राने व राज्य सरकारने असमर्थता दर्शविल्याने सोमय्या यांनी प्रचंड निधी गोळा केला. त्यासाठी रेल्वे स्थानक, विमानतळावर डब्बे घेवुन उभे राहीले. आयएनएस विक्रांत हे जहाज देशाच्या दृष्टीने अभिमानाचा विषय असल्याने लोकांनी सढळहस्ते दान केले. नेव्हीनगरमध्ये राहणार्‍या नौदलाच्या अनेक अधिकार्‍यांनी प्रत्येकी ५ ते १० हजार रुपये दिले.

या रकमेचे सोमय्या यांनी काय केले ते देशाला समजायला हवे. ही रक्कम ते भंगारात जावु पाहणार्‍या विक्रांत युध्दनौकेचे स्मारक बनविण्याकरीता राजभवन येथे जमा करणार होते. मात्र सोमय्याने जमा केलेली रक्कम राजभवनाला मिळाली नसल्याची माहिती आरटीआयमधुन समोर आली आहे. लोकांच्या देशप्रेमाशी खेळुन किरीट सोमय्या यांनी गद्दारी केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा.

किरिट सोमय्या यांनी विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या निधीचे काय झाले हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण हा विषय देशाच्या सुरक्षेच्या संबंधीत आहे. लोकांनी मोठ्या विश्वासाने विक्रांत वाचविण्यासाठी मोठया प्रमाणात देणगी दिली. राजभवन प्रशासनाने आपल्याला कीरीट सोमय्याकडुन कोणताच निधी कींवा चेक मिळाला नसल्याची माहीती अधिकाराखाली मागविलेल्या उत्तरावर स्पष्टीकरण देतांना म्हटले आहे. किरिट सोमय्या यांनी जमा केलेला निधी राजभवनमध्ये जमा झाला नाही तर मग तो कोणाच्या खिशात गेला याचे उत्तर राज्यातील जनतेला मिळायला हवे. या घोटाळ्यात कीरीट सोमय्या यांनी अंदाजे १०० कोटीचा घोटाळा करुन हा पैसा त्यांच्या बांधकाम व्यवसायाकरीता तसेच निवडणुक खर्चाकरीता वापरल्याबाबत अंदाज केला जात आहे. अशा देशद्रोही कृतीमुळे कीरीट सोमय्याला राज्यात तर काय देशातही राहण्याचा अधिकार नाही. या देशद्रोहयाची जागा तुरुंगात असायला हवी. महाराष्ट्रातील तसेच देशातील जनता या प्रशाचे उत्तर कीरीट सोमया तसेच भाजपाकडुन मागत आहे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


निवेदन देतांना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्यासह तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, युवासेना जिल्हा संघटक रवि भांदुर्गे, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, उपशहरप्रमुख नामदेवराव हजारे, उपतालुकाप्रमुख गजानन जैताडे, युवासेना शहर संघटक गजानन ठेंगडे, युवराज शांकट, वसुदेव भुसारी, श्याम खरात, गणेश इंगोले, विनोद वानखेडे, राजेश बोडखे, गोपाल लव्हाटे, प्रसिध्दीप्रमुख अशोक शिराळ, नंदु हिरवे, बालाजी शिंदे, राजु धोंगडे, संदीप गंगावणे, ज्ञानेश्वर गोरे, नंदु भोयर आदी शिवसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!