प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम – जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्य ११ महाराष्ट्र बटालियन अकोलाचे कमांडिंग ऑफिसर चंद्रा प्रकाश बदोला यांच्या मार्गदर्शनात एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या नेतृत्वात स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी सैनिकांनी ७ एप्रिल रोजी तंबाखुमुक्त शाळा अभियानांतर्गत शहरातील विविध चौकात तंबाखुबंदीवर पथनाट्य सादर करुन नागरीकांमध्ये जनजागृती केली. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे मानसोपचारतज्ञ राम सरकटे उपस्थित होते.

तसेच आयोजित पोस्टर स्पर्धेतुन तंबाखु व व्यसनाचे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम, प्रदुषित परिसर, अस्वच्छ वातावरण प्रकाश टाकण्यात आला. कर्करोगाला कारणीभूत तंबाखू हा एक प्रमुख घटक आहे आणि त्याचा प्रतिबंध करता येऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार २०१९-२० मध्ये ७० टक्क्याहून जास्त मृत्यू हे असंसर्गजन्य आजारामुळे झाले आहेत. क्षयरोग, अपघात, खून, आत्महत्या, एड्स आणि मलेरीया या सर्वांमुळे एकत्रितपणे होणार्या मृत्यूपेक्षा तंबाखूच्या वापरामुळे होणारे मृत्यू जास्त आहेत. ‘तंबाखु की नशा अनमोल जीवन की दुर्दशा’, गाडी के धुये सबसे अधिक खतरनाक बीडी, सिगारेट का धुवॉ होता है’, ‘तंबाखू एक बुरी आदत है इसे बदल डालो’, ‘तंबाखु मतलब खल्लास’ असे विविध संदेश या पथनाट्याव्दारे देण्यात आले.
