श्री भगवान महावीर जयंती निमित्त जिल्हयातील मांसविक्री व दारुविक्री बंद ठेवण्याची मागणी , जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम – जैन बांधवांचे श्रध्दास्थान असलेले व सत्य, अहिंसा, अपरिग्रहाचे पुरस्कर्ते, २४ वे तीर्थकर, वर्तमान युगप्रवर्तक श्री भगवान महावीर यांच्या २६२१ व्या जयंती उत्सवानिमित्त गुरुवार, १४ व शुक्रवार, १५ एप्रिल रोजी जिल्हयातील व शहरातील सर्व कत्तलखाने, मांसविक्री व देशीविदेशी दारु विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याची मागणी श्री भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती व समस्त दिगंबर जैन समाजाच्या वतीने रमेशचंद्र बज यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, दारु उत्पादन शुल्क अधिकारी व पोलीस स्टेशनला निवेदन देवून केली आहे.


या निवेदनात म्हटले आहे की, अखिल विश्वाला सत्य, अहिंसा, अपरिग्रहाचा संदेश देणारे जैन धर्मियांचे २४ वे तीर्थकर वर्तमान युग प्रवर्तक भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव अखिल विश्वात ‘अहिंसा वर्ष म्हणून साजरा होत आहे. केंद्र सरकारव्दारे सुध्दा या महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत हा सर्व धर्मियांचा देश असून भगवान राम, श्रीकृष्ण, भगवान बुध्द, महावीर, पैगंबर, गुरुनानक व महात्मा गांधी आदी महान थोर महापुरुषांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे. या सर्व महान थोर पुरुषांनी पशुदयेचाच उपदेश दिला आहे.

भगवान महावीरांनी जिओ और जिने दो हा प्रचार प्रसार केला आहे. व ह्या क्रुर हिंसेच्या काळात मानवाला हिंसाचारापासून परावृत्त केले आहे. आजही त्यांच्या शिकवणूकीची अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे. तरी भगवान महावीर जयंती निमित्त जिल्हयातील, तालुक्यातील व शहरातील सर्व कत्तलखाने, मांसविक्री व दारुविक्रीची दुकाने दोन दिवस बंद ठेवण्याची मागणी महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती व समस्त दिगंबर जैन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. जैन समाजाच्या भावना लक्षात घेता यासंदर्भातील कार्यवाहीचे ठोस आश्वासन अधिकार्‍यांनी यावेळी दिले. निवेदन देतांना सकल जैन समाजाचे प्रतिनिधी हजर होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!