गोपाल पाटील अरबट यांच्या प्रयत्नातून केले तिघांना रक्तदान

दर्यापुर – महेश बुंदे

नेहमीच रुग्णांच्या मदती करता धावणार नेतृत्व म्हणजेच दर्यापूर तालुका शिवसेना प्रमुख व सामाजिक कर्यकर्ते गोपाल पाटील अरबट होय, दर्यापूर येथील दर्यापूर जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये एका पेशंटला रक्ताची आवश्यकता होती, डॉक्टरांनी फोन करून रुग्णसेवक गोपाल पाटील अरबट यांना कळविले लगेच गोपाल पाटील अरबट यांनी तात्काळ प्रतिसाद देऊन तीन रक्तदाते घेऊन अमरावती येथे रक्तदान करून त्या पेशंटला त्वरित रक्त पुरवण्यात आले तसेच पनोरा येथील रुग्ण अंभोरे यांना पण ईर्विन मध्ये रक्ताची आवश्यकता होती हे समजताच लगेच गोपाल पाटील अरबट त्यांनी दुसरे डोनर बोलावून घेतले व रक्तदान करून त्यानां पण रक्त पुरवण्यात आले,.

रक्तदान हे श्रेष्ठ दान असून रक्तदानासाठी प्रत्येकाने तयार रहावे, वर्षातून दोन वेळा तरी रक्तदान केले पाहिजे, रक्त दान केल्याशिवाय रक्त मिळण्यासाठी दुसरा तिसरा पर्याय नसून रक्तदान हे एक जीवनदान असल्याचे मत अमरावती जिल्हा पावर ऑफ मीडिया जिल्हा उपाध्यक्ष गजानन देशमुख यांनी व्यक्त केले असून गोपाल पाटील अरबट यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन व त्यांच्या रूग्णसेवेला शुभेच्छा दिल्या.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!