चाकण येथे वीज चोरी, अधिकाऱ्यांना मारहाण , आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

चाकण वार्ता (प्रतिनिधी लहू लांडे) :- दिनांक ०६/०४/२०२२ रोजी मदन हनुमंत मुळुक वय ३४ वर्षे, (सहायक अभियंता चाकण) व सोबत मयुर चंद्रकांत चौधरी (विदयुत सहायक), गंगाराम बुधाजी तळपे (वरिष्ठ तंत्रज्ञ), गणेश अनिल चौधरी (विदयुत सहायक), कृष्णा बबन जाधव (बाहयस्त्रोत कर्मचारी) असे एकञीत दैनंदिन कामकाज करीता चाकण परीसरात निरीक्षण करीत असताना सकाळी १०:३० वा चे सुमारास राक्षेवाडी बंधारा येथे

गोपीनाथ मारुती जाधव रा. मु.पो. काळुस ता. खेड जि.पुणे हे मौजे चाकण गावच्या हद्दीतील बंधारा शेजारी ता.खेड जि.पुणे यांनी अनधीकृतपणे चोरुन ट्रान्स्फर मधुन जाणा-या लघुदा विद्युत वाहिनीवर आकडी टाकुन गोपीनाथ जाधव हे त्यांच्या घरी चोरुन वीज वापरत असताना आढळले .

तेव्हा संबंधित विद्युत अधिकारी यांनी गोपीनाथ मारुती जाधव यांना त्यांनी ओळख सांगितली व सदर आकडी टाकलेबाबत विचारणा केली असता जाधव हे अधिकाऱ्याचा अंगावर धावुन गेले व सहाय्यक अभियंता मुळूख, सोबत असणारे मयुर चंद्रकांत चौधरी यांना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यात मुळूख यांच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली व सहकारी मयुर चंद्रकांत चौधरी यांना उजव्या डोळयास दुखापत करुन शासकीय कामात अडथळा निर्माण करून मारहाण,शिवीगाळ ,दमदाटी केली व वीज चोरी करताना आढळून आले.


म्हणून इसम इसम नामे गोपीनाथ मारुती जाधव रा. मु.पो. काळुस ता.खेड जि. पुणे यांच्या विरोधात चाकण विद्युत अधिकारी यांनी चाकण पोलीस स्टेशन येथे सदर व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस करीत आहे
.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!