राजगुरूनगर | 28 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्य ; डॉक्टरला नातेवाईकांनी केली गंभीर मारहाण 

खेड वार्ता:- खेड तालुक्यातील चांडोली फाटा येथे खाजगी रुग्णालयात 28 वर्षीय महिलेवर औषध उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

डॉक्टरानी उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरला नातेवाईकांनी गंभीर मारहाण करत रुग्णालयाच्या काचाही फोडल्याची घटना (6 एप्रिल) रोजी दुपारी घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, खेड तालुक्यातील कडुस तुरुकवाडी येथील निलोफर शमसुद्दीन मोमीन (वय 28) या विवाहित महिलेने घरगुती कारणावरून विष प्राशन केले होते. पुढील औषध उपचारासाठी चार दिवसापुर्वी चांडोली फाटा येथील जीवनरक्षा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज (बुधवारी) दुपारच्या दरम्यान त्या महिलेचा उपचारादरम्यान मुत्यू झाला आहे.

रुग्ण दगावला कसा? अशी विचारणा करत संतप्त नातेवाईकांनी डॉ. रमेश शेजुळ (रा. राक्षेवाडी, ता. खेड) यांच्या डोक्याला सॅनिटायझरच्या लोखंडी स्टँडने मारहाण केली आहे. त्याचबरोबर हॉस्पिटलच्या काचा फोडल्या, या मारहाणीत डॉ. शेजुळ गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी चाकण येथे दाखल केले गेले.

दरम्यान, याबाबत माहिती मिळताच पोलिस निरिक्षक सतीश गुरव पोलिस उपनिरिक्षक भारत भोसले , पोलिस हवालदार संतोष घोलप ,संदिप भापकर , नवनाथ थिटे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी जमलेल्या जमाव व नातेवाईकांना शांत केले.
याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात दोन्ही बाजुने गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!