प्रतिनिधी :- आर.एन.माळी.
दिनांक :- 06.04.22.रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे विद्यार्थी युवा संघटनेचे उपाध्यक्ष कु. शिवराज मनोजराव काळभोर यांनी लोणी काळभोर गणपती मंदिर चौक येथे वंदनीय राज्यमंत्री ना. बच्चुभाऊ कडू यांच्या मातोश्री कै. इंदिराबाई बाबाराव कडू यांच्या स्मृति प्रित्यर्थ भव्य रक्तदान , आरोग्य तपासणी शिबिर व महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास ना.बच्चुभाऊ कडू.प्रहार
संस्थापक अध्यक्ष ,राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी 10.00 वाजता रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी व महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिरास सुरुवात करण्यात आली. तसेच दुपारी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा, कामगार, शिक्षण राज्यमंत्री यांचे अनमोल असे मार्गदर्शन झाले. यावेळी परिसरातील व पुणे जिल्हा मधील बच्चुभाऊ वर प्रेम करणारी असंख्य प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.
