Post Views: 587
अंजनगाव सुर्जी – महेश बुंदे
अंजनगाव सुर्जी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाची ३ लाखाची पिशवी चोरण्याचा प्रयत्न दिनांक ४ एप्रिल रोजी करण्यात आला. सी. सी. टी. व्ही. फुटेज चेक केली त्यामध्ये दोन महिला ग्राहकाची पिशवी चोरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनात आले,
पोलिसांकडून त्या संशयीत महिलांचा शोध घेणे चालू आहे. याची माहिती पोलिसांनी (दि. ०५) बुधवार रोजी दिली. माहिती अशी की, तीन दिवस बँक बंद होत्या सोमवारी बँक खुल्ल्याने व बाजाराचा दिवस असल्याने बँकेमध्ये खूप गर्दी होती त्यामुळे एक खातेदार बँकेत पैसे जमा करण्यासाठी आला व रांगेत असताना त्याच्या हातात पैसे असलेली थैली होती त्या खातेदाराच्या बाजुला महिला रांगेत उभ्या होत्या खातेदाराचे अचानक थैली कडे लक्ष घेले असता त्याला थैली उभी कापलेली दिसली. त्याला आपले पैसे चोरण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून फुटेज चेक केले असता त्यामध्ये दोन महिलानी थैली कापल्याचे निदर्शनात आले याची माहिती पोलिसांना देताच पोलीसांनी संबधित संशयित महिलांचा शोध सुरु करण्यात आला.