दर्यापूर – महेश बुंदे
दि. ६ एप्रिल रोजी प्रबोधन विद्यालयाचे संस्थापक पू.मामा क्षीरसागर यांची पुण्यतिथी महाविद्यालयात साजरी करण्यात आली.दर्यापुर येथील सुविख्यात प्रबोधन विद्यालयाची स्थापना या ऋषितुल्य विभूतीने १५ जून १९३९रोजी दर्यापूर सारख्या या छोट्या गावात केली आणि प्रबोधनच्या विद्यार्थी रुपी सुमनांचा सुवास,कीर्ती दशदिशांत पसरली आहे.२३ विद्यार्थ्यांवर सुरू केलेल्या संस्थेचा आज वटवृक्ष झाला.

प्रबोधन विद्यालयाचे विद्यार्थी देशातच नव्हे तर परदेशात जाऊन किर्तीवंत झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्थान प्राचार्य श्री रेवस्कर यांनी भूषविले. पू. मामांच्या जीवनावर विद्यालयाच्या पर्यवेक्षिका कु.भिसे मॅडम यांनी प्रकाश टाकला, उत्कृष्ट शिक्षकांची नेमणूक करून व दर्यापूरकरांचा विश्वास संपादन करून पू. मामांनी शाळा नावारूपाला आणली तसेच त्या काळात प्रबोधन विद्यालयाच्या विश्वस्त मंडळाचे माजी अध्यक्ष पद्मभूषण बॅरिस्टर रामराव देशमुखांची मामांना भक्कम साथ लाभली. ५ एप्रिल रोजी बॅरिस्टर रामराव देशमुख यांची पुण्यतिथी होती.
