प्रतिनिधी सुनिल बटवाल
चिंबळी दि ६(वार्ताहर) ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाचा बैल गाडा शर्यत आवडीचा आहे तसाच तरुण वर्गाचा पण कुस्ती स्पर्धा हा एक खेळ आवडीचा असल्याने कस्ती स्पर्धेचा आदर राखला पाहिजे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख व जि प सदस्य ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांनी मरकळ येथे केले.

मरकळ (ता खेड)येथील श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्साहा निमित्ताने श्रीची महापुजा अभिषेक करून हारतुरे मांडव डहाळे पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आली होती तर संगीत भजनांचा कार्यक्रम व मालती इनामदार यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यानंतर निकाली कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या य आ स्पर्धेसाठी कटके यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते या कुस्ती स्पर्धेसाठी मरकळ ग्रामस्थाच्या वतीने भव्य निकाली कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये २७निकाली कुस्ती स्पर्धेत ६० मल्ल सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवत उपस्थित मान्यवरांची व कुस्ती शौकीनाची मने बहारून टाकली होती यामध्ये मुन्ना झिझुरके विरूद्ध विलास डोईफोडे यांची १लाख रूपायाची शेवटची कुस्ती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली .

यामध्ये विलास डोईफोडे यांने मुन्ना झिझुरके याला जितपट करत निकाली कुस्ती विजयी केली याप्रसंगी महाराष्ट्र केसरी अभिजित कटके यांचा व जि प सदस्य अतुल देशमुख माजी उपसरपंच चंदन मु-हे व आदि मान्यवरांचा ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष सोमनाथ लोखंडे यांनी सांगितले यावेळी माजी सरपंच दशरथ लोखंडे तुकाराम वहिले तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष किरण लोखंडे माजी उपसरपंच सचिन लोखंडे रोहिदास लोखंडे उमेश वर्पे बाळासाहेब लोखंडे भगवान लोखंडे काळूराम लोखंडे सागर गावडे मंगेश ठाकुर भरत कड आदि मान्यवर उपस्थित होते.

