Post Views: 428
कुऱ्हा बँक मॅनेजरवर कारवाई चा आश्वासन मुख्य नोडल अधिकारी शशी रंजनकुमार यांनी दिले
अमरावती – महेश बुंदे
अपंग हक्क अधिनियम २०१६ चा कायदा लागू करण्यात आला आहे या कायद्यामध्ये अपंग आहे म्हणून कोणत्याही योजना व सवलती नाकारल्यास कार्यवाहीची तरतुद करण्यात आली असून तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथील इंडीयन ओवरसिस बँकेचे बँक मॅनेजर यांनी अपंग मतीमंद मुलगी असल्यामुळे तिच्या पाल्यांना संयुक्त बँक खाते देण्यास नकार दिला व उद्धट वागणूक देवून त्यांची दिशाभूल केली
अशा बँक मॅनेजरच्या विरोधात आम्ही अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावतीच्या वतीने निषेध व्यक्त करतो व ह्या बँक मॅनेजरवर अपंग हक्क अधिनियम २०१६ च्या अंतर्गत कार्यवाही व्हावी म्हणून अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य अमरावती जिल्हाध्यक्ष श्री . मयुर मेश्राम यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यालय इंडीयन ओवरसिस बँक गांधी चौक , अमरावती येथे ठिय्या आंदोलन चा इशारा दिला होता या आंदोलनाच्या दणक्या मुळे कुऱ्हा बँक मॅनेजर ने अपंग मतिमंद मुलीला तात्काळ बँक मध्ये बोलावून ३० मिनिटांच्या आत खाते काढून खाते पुस्तक हाती दिले असुन बँक मॅनेजर वर कार्यवाही साठी मुख्य कार्यालयातील नोडल अधिकारी शशिरंजन कुमार यांच्या सोबत चर्चा करण्यात आली .
यावेळी अपंग जनता दल चे पदाधिकारी राहुल वानखडे, कांचन कुकडे, शेख रुस्तम ,राजीक शहा ,अनवर शहा, अजय वाहूरवाग , प्रभाकर राऊत, गोपाल वनवे, अर्चना रिसे, सरोज पुनसे,शेख बब्बु ,अमोल इतिवाले,सोफियान खान,मो .राजिक, मो.इलियास याचा सह ५० कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.