महानंदा अगुलदरे यांचे पक्षीप्रेम ; पोरके झालेल्या पिलांना मायेनं वाढवणारी पक्षिमैञीण

प्रतिनिधी फुलचंद भगत


मंगरूळपीर:-कडक ऊन्हाळ्यात आईपासुन पोरके झालेले भोर पक्षांची दोन छोटेछोटे पिल्लांना सांभाळून महानंदा विष्णू अगुलदरे यांनी पक्षिप्रेम जोपासले आहे.प्राणीमाञांविषयी कनवळा असणार्‍या या पक्षिमैञीणीचे सर्वञ कौतुक होत आहे.


मंगरुळपीर शहरातील नविन सोनखास परिसरात राहणार्‍या महानंदा विष्णू अगुलदरे यांच्या घरातील झाडावर भोर पक्षाने काही दिवसांपुर्वी घरटे बांधले.काही कालावधीनंतर त्या घरट्यात छोटी दोन पिल्लंही त्या भोर पक्षाला झाली.घरात वावरतांना घरातील सदस्यांना हे पक्षी नेहमी दृष्टीपथास पडायची.कडक ऊन्हाळा असल्यामुळे जीवाची लाही लाही होत असतांना महानंदा अगुलदरे या त्या घरट्याशेजारी दाना पाणी नियमित ठेवायच्या.परंतु काळाचा घाला झाला.त्या पक्षांची आई घरट्यात परतलीच नाही त्यामुळे पक्षी आईच्या वियोगाने घरट्यात आकांत करुन किलबिलाट करीत होते.भोर पक्षीण घरट्यात परतेल असे अगुलदरे परिवारालाही वाटले परंतु तसे झाले नाही.शेवटी महानंदा यांनी त्या आईपासुन पोरक्या झालेल्या भोर पक्षांच्या पिल्लांना सांभाळन्याची जबाबदारी ऊचलली.कुटुंबातीलच सदस्य म्हणून रोज त्या पिलांना चारापाणी खावू घालुन सांभाळ करीत आहेत.

हे पिल्लं थोडे मोठे झाल्यावर निसर्ग अधिवासात सोडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.पोरके झालेल्या पिल्लांना मायेनं वाढवणार्‍या महानंदा अगुलदरे या पक्षिमैञीणचे सर्वञ कौतुक होत आहे.घरी आलेले मुके जणावरे यांनाही न चुकता घासकुटका भरवणार्‍या आणि दारावर आलेल्या गरजुंनाही नेहमी मदत करणार्‍या या अगुलदरे परिवारांचा परोपकारांचा हा आदर्श सर्वांनी घ्यावा असे निसर्गप्रेमीकडुन आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!