प्रतिनिधी ओम मोरे
अमरावती वार्ता :- ब्रेकींग न्युज मिळालेल्या माहितीनुसार ,अमरावती यवतमाळ रोडवर शिंगणापूर फाट्याजवळ झालेल्या अपघातात एक जण ठार तर २४ जण जखमी झाले आहेत.या अपघातामधील सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पुसद आगाराची बस (एमएच ४० वाय ५९२६) ट्रकची समोरा समोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. ही बस पुसदहून अमरावतीला जात असताना नांदगाव खंडेश्वर जवळील शिंगणापूर चौफुलीवर हा अपघात झाला.
दरम्यान या अपघातात एक जण ठार तर २४ जण जखमी झाले आहेत.हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर बस चक्क रस्त्याच्या खाली घुसल्या जाऊन रस्त्याच्या कडेला गेली आहे. त्यामुळे प्रवासी गंभीर जखमी झालेले आहे. जखमींमध्ये दोन बालकांचा समावेश आहे.
जखमी प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.एवढ्या मोठ्या अपघातानंतर घटनास्थळी एकच गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती. स्थानिक पाेलिस या अपघाताचा पुढील तपास करीत आहे.


