विशेष प्रतिनिधी बापूसाहेब सोनवणे
पिंपरी चिंचवड वार्ता:- दिनांक ०६/०४/२०२२ सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने अवैधरित्या शासनाने प्रतिबंधीत केलेल्या तंबाखूजन्य गुटख्याची मोठ्या प्रमाणात साठवणुक करुन विक्री करणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई केलेबाबत. मिळालेल्या माहितीनुसार”
मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक ०५/०४/२०२२ रोजी महाळुंगे (ई) पोलीस चौकी तसेच तळेगांव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी शासनाने प्रतिबंधीत केलेल्या तंबाखूजन्य गुटख्याची मोठ्या प्रमाणात साठवणुक करून विक्री करणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक ०५/०४/२०२२ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी महाळुंगे (ई) पोलीस चौकीच्या हद्दीत सद्गुरु ऑटोकम्पोनन्ट्स प्रा. ली. गेट नंबर २०१, चाकण तळेगांव रोड, महाळुंगे ता. खेड जि. पुणे या कंपनीजवळ सिताबाई महाळुंकर यांच्या भाड्याचे रुममध्ये इसम नामे सुशिल उर्फे अमित गुप्ता हा स्वतः राहत असलेल्या रुममध्ये स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखूजन्य गुटख्याची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणुक करुन विक्री करीत आहे.
अशी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनिय माहितीवरून सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी न पोलीस अंमलदार यांनी चाकण पोलीस स्टेशन अंकित महाळुगे (ई) पोलीस चौकी हद्दीत १२:०० वाजता सापळा रचुन छापा टाकुन खालील मुद्देमाल मिळुन आला त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
१) १,९५.३८८/- रु किं चा शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य गुटखा असा एकुण १,९५,३८८/- रु किं चा मुद्देमाल मिळुन आला आहे .

म्हणुन अटक आरोपी नामे १) सुशिल उर्फे राधेशाम गुप्ता वय ३२ वर्षे रा. सद्गुरु ऑटोकम्पोनन्ट्स प्रा. लि. गेट नंबर २०१, चाकण-तळेगांव रोड, महाळुंगे ता. खेड जि. पुणे या कंपनीजवळ, रामचंद्र महाकुंगकर यांच्या भाड्याचे रुममध्ये मुळगांव मु.पो. मदारीपूर ता. जि. जालुन राज्य उत्तरप्रदेश तसेच पाहिजे आरोपी नामे २) रामा चौधरी वय अंदाजे २५ वर्षे रा. खालुंब्रे ता. खेड जि. पुणे (पुर्ण नांव पत्ता माहित नाही) ३) ओमप्रकाश उर्फे ओमजी बिष्णोई वय ४५ वर्षे रा. खालुब्रे ता. खेड जि. पुणे (पुर्ण नांव पत्ता माहित नाही) यांचेविरुध्द महाळुंगे (ई) पोलीस चौकी येथे गुरनं ४९२/२०२२ भादंवि कलम ३२८. २७२, २७३. १८८ ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास महाळुंगे (ई) पोलीस चौकी करीत आहे.
तसेच दिनांक ०५/०४/२०२२ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे दुसऱ्या पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अगलवार यांनी तळेगांव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत सदुंबरे ता. मावळ जि. पुणे येथील गाडे प्राव्हिजन स्टोअर्स चे पाठीमागील रुममध्ये इसम नामे समिर गाडे हा त्याचे मालकीचे रुममध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य गुटख्याची साठवणुक करून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी गिहाईकांना गुटख्याची विक्री करीत आहे.
अशी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनिय माहितीवरून सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तळेगांव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत सायंकाळी ०४:१० वाजता सापळा रघुन छापा टाकुन खालील मुद्देमाल मिळून आला त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
१) ३,७७,०९०/- रुकिंचा तंबाखूजन्य गुटखा,२) ४,०००/- रु रोख रक्कम ३) ५,०००/- रु.किंचा एक अॅण्ड्राईड मोबाईल जु.वा.किं.अं. असा एकुण ३,८६,०९०/- रु.किंचा मुद्देमाल मिळून आला आहे.
