दि.५ एप्रील सोजी सकाळी उघडकीस आली
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-वाशिमच्या रिसोड तालुक्यातील रिठद येथील बस स्टैंड समोर असलेल्या बैंक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या ए टी एम ची मशीनच चोरटयानी चोरुंन नेल्याची घटना आज पहाटे 3 ते 3.30 वाजताच्या दरम्यान घडलली.याची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी सदर एटीम मशीन शेजारील खंडाळा गावातून ताब्यात घेतली आहे. विशेष म्हणजे या ए टी एम मशीन मध्ये रोकड नसल्याची माहिती समोर येत आहे.

5 क्विंटल च्या वर वजन असणारी, व जमिनीत नट बोल्ट लावून फिट असणारी मशीन सहज चोरून चोरून नेल्याने हा चर्चेचा विषय ठरला असून या घटनेचा अधिक तपास वाशिम ग्रामीण पोलीस निरीक्षक विनोद झळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे आहे.
