अमरावती वार्ता :- राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण लिपिक संवर्गीय संघटना व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग कर्मचारी संघटना यांचे वतीने एन पी एस हि नवीन पेन्शन योजना बंद करण्यात येऊन कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना शासनाचे वतीने लागू करण्यात यावी या मागणीसाठी आज शासकीय तंत्रनिकेतन अमरावती या संस्थेच्या जोरदार घोषणाबाजीसह ठिय्या आंदोलन करण्यात आले.
देशामध्ये लोकनिर्वाचित लोकप्रतिनिधींना 5 वर्षासाठी निवडून आल्यावर आजीवन पेन्शन दिल्या जाते.तसेच न्यायालयीन कर्मचारी यांना जुनी पेन्शन दिल्या जाते. मात्र आपल्या जीवनाचे 30 ते 35 वर्ष शासनात सेवा बजावून उतारवयात नवीन पेन्शन प्रणाली मध्ये कर्मचाऱ्यांना परावलंबी व अपंग बनविलेले असून “एक देश एक न्याय” या तत्वानुसार सर्वानाच जुनी पेन्शन योजना लागू व्हावी याकरिता राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाचे निमित्ताने अमरावती येथें NPS ( अंशदायी पेन्शन ) योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना चालू करा.,महाराष्ट्रात १६०० कर्मचारी मयत झाल्याने कुटुब उधवस्त झाले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा.,मधल्या कालवधीत केद्रीय कर्मच्या-याप्रमाणे NPS कर्मचा- याना अनुज्ञेय असलेले सर्व लाभ ( कुटुंब निवृत्ती वेतन ग्रच्युईटी वगैरे ) कर्मचा-याना अनुज्ञेय करावेत.,पूर्वीच्या सेवेचा राजीनामा देऊन (१ नोव्हेबर २००५ पूर्वी ) नवीन सेवा स्वीकारलेल्या तसेच नोव्हेंबर २००५ पूर्वी निवड झालेल्या परंतु उशिरा नियुक्ती आदेश मिळालेला कर्मचा-यांना जुनी परिभाषित पेशन्श योजना लागू करा .
या प्रमुख मागण्यासाठी आज ठिय्या आंदोलन करण्यात आले.पुकारलेल्या ठिय्या आंदोलनास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण लिपिक संवर्गीय संघटनेचा पाठींबा असून दर्शविला.सर्व लिपिक,प्रयोगशाळा सहाय्यक,तांत्रिक, अतांत्रिक,कर्मशाळा विभागातील निदेशक,शिपाई,हमाल यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून सहभाग दर्शविला. यावेळी रवी हिवलेकर. राजेश चौकडे अनुराग हिवरेकर राहुल कुलकर्णी हितेश राऊत जगदीश चव्हाण पी. बी घाटे. गजानन मामडे. प्रतीक लेव्हरकर शिवाजी वाघमारे. संजय मेश्राम. व्ही. आर. पंचवटकर. ज्ञानेश्वर खुपते अविनाश धजेकर यांचेसह शासकीय तंत्रनिकेटांचे शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते
रवि मारोटकर ब्युरो चीफ