दर्यापूर – महेश बुंदे
कोविड काळात संपूर्ण मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या संसर्गापासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी दोन वर्षांपासून ऑनलाइन शिक्षण सुरू होते. या लॉकडाऊनमुळे विद्यार्थी मैदानापासून दूर गेले, त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा शारीरिक व मानसिक त्रास होत असून यातून या विद्यार्थ्यांना बाहेर काढून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी या ग्रीष्मकालीन खेळ व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
असे प्रतिपादन प्रबोधनचे प्राचार्य दत्तात्रय रेवस्कर यांनी केले. दर्यापूर शहरातील प्रबोधन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१५ ते ३० एप्रिल दरम्यान आयोजित ग्रीष्मकालीन खेळ व क्रीडा कला प्रशिक्षण शिबिराची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
