दर्यापूर – महेश बुंदे
तालुक्यातील श्रीक्षेत्र अडुळाबाजार येथील संत लहानुजी महाराज संस्थान येथे रामायण सेवा मंडळ दर्यापूर द्वारा श्रीराम नवमी निमित्ताने श्रीराम कथा दि. ४ एप्रिल ते १० एप्रिल दरम्यान रोज संध्याकाळी ७ ते १० वाजेपर्यंत आयोजित केली आहे.

या कथेचा दि. ४ एप्रिल रोजी प्रारंभ झाला, ही कथा सप्ताह १० एप्रिल पर्यत सुरू असणार आहे. या रामकथेचे वाचन नवल किशोरजी मालपाणी दर्यापूर यांच्या अमृत वाणीतून होणार आहे. त्याना संगीत साथ नालवादक पुरुषोत्तम धुराटे, हार्मोनियम वादक नामदेव उटाळे, मंजिरा वादक नंदकिशोर पातोंड, गायक तथा कोरस वादक धनंजय धोके आदीची लाभणार आहे, तरी या राम कथेला पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री संत लहानुजी महाराज संस्थान व रामायण सेवा मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
