प्रतिनिधी लहू लांडे
पुणे वार्ता:- खेड तालुक्यातील जि. प.शाळा खरपूडी खुर्द येथे मंगळवार दि.5/4/2022 रोजी शाळा पुर्व तयारी मेळावा ढोल ताश्यांच्या गजरात गावातून वाजता गाजत प्रभातफेरी काढून मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मेळाव्यास गावाचे सरपंच प्रकाश गाडे,उपसरपंच पूनमताई गाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ गाडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक,शिक्षक वृंद,उपस्थित होते.शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, व पालक या सर्वांच्या अनमोल सहकार्यामुळे मेळावा सुंदर रितीने संपन्न झाला.


