कुरिअर ने मागवल्या तब्बल..92 तलवारी, 2 कुकरी आणि 9 खंजीर , पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

पिंपरी चिंचवड – औरंगाबाद येथे डी. टी. डी. सी कुरिअर कंपनी मध्ये अवैधपणे तलवारीचा साठा आढळून आल्यानंतर पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे.
औरंगाबादच्या पार्श्वभूमीवर दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी हद्दीतील कुरिअर कंपनीत जाऊन येणाऱ्या प्रत्येक पार्सलचे स्कॅनिंग करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार केलेल्या तपासणीत कुरिअरने मागवलेल्या 97 तलवारी, 2 कुकरी, 9 म्यान असा 3 लाख 22 हजार रुपयांची शस्त्रे पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश सुद (रा. घर नं.40, ग्रीन अ‍ॅव्हेन्यु, अमृतसर – , पंजाब – , अनिल होन (रा. औरंगाबाद), मनिंदर (रा. खालसा फोर्स शॉप, घंटा घर कॉम्पलेक्स, मार्केट दरबार साहेब, अमृतसर, पंजाब), आकाश पाटील (रा. मु. पो. चितली ता. राहता जि. नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथे डीटीडीसी कुरिअर कंपनीमध्ये अवैधपणे तलवारीचा साठा आढळून आला होता. त्या अनुषंगाने सर्व कुरिअर कंपनीमध्ये येणाऱ्या पार्सलचे काळजीपूर्वक स्कॅनिंग करण्याबाबतच्या सूचना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कुरिअर कंपन्या त्यांच्या गोडाऊनमधील माल एक्सरे मशीनमधून स्कॅन करीत होत्या.

डीटीडीसी कुरिअर कंपनीचे दिघी येथे मध्यवर्ती वितरण केंद्र असून, कंपनीचे दिघी येथे गोडाऊन आहे. आरोपी उमेश सुद याने अनिल होन याला 2 लाकडी बॉक्स डीटीडीसी कुरिअर कंपनीमध्ये पार्सल पाठवले होते. हे बॉक्स 1 एप्रिलला एक्सरे स्कॅनिंग मशिनद्वारे तपासणी केली असता बॉक्समध्ये तलवार सदृश वस्तू आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी दोन लाकडी बॉक्समधील 92 तलवारी, 2 कुकरी, 9 म्यान असा एकूण 3 लाख 22 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी मनींदर याने आरोपी आकाश पाटील याला एका बारदानाच्या कपड्यामध्ये पार्सल पाठवले होते. डीटीडीसी कुरिअर कंपनीच्या दिघी येथील गोडाऊनमध्ये रविवारी (दि.3) बारदानाच्या कापडातील या पार्सलची एक्सरे स्कॅनिंग मशिनद्वारे तपासणी केली. त्यावेळी त्यामध्ये तलवार सदृश वस्तू आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी 15 हजार रुपये किमतीच्या 5 तलवारीजप्त केल्या.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ,अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे ,पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मंचक इप्पर ,सहायक पोलीस आयुक्त चाकण विभाग प्रेरणा कट्टे,यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रकाश जाधव ,पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी ,पोलीस उपनिरीक्षक भंडारे, पोलीस हवालदार अमोल जाधव, शेखर शिंदे, घुगरे, चालक पोलीस नाईक हेमंत डुंबरे यांच्या पथकाने केली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी करीत आहेत.

पुण्यात हिंसाचाराच्या वाढत्या घटना

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात हिंसक प्रकार वाढताना दिसत आहेत. पुणे-पिंपरी चिंचवड शहरात गुंडांनी तलवारी नाचवल्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे तलवारी मागवण्याचा किंवा पाठवण्याचा उद्देश काय होता? हे शोधणं पोलिसांसमोरील आव्हान ठरत आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!