दर्यापूर – महेश बुंदे
वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे सध्या पृथ्वीचे तापमान वाढते आहे. मार्च महिन्यापासूनच आपण राज्यातील अनेक भागात तापमान वाढताना पाहत आहोत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. पुरेसे पाणी प्या, सैल कपडे परिधान करा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र रहाटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष डाबेराव यांनी केले आहे. सर्व साधारणपणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल, मे व जून या या महिन्यात उष्माघाताचा तापमान प्रादुर्भाव होत असतो. तसेच त्यामुळे मृत्यही होणे संभवनीय असते. उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक ल, वृद्धलोक, व लहान मुले, गरोदर महिला व स्थूललोक, पुरेशी झोप न झालेली लोक, मधुमेह, हृदयविकार, दारूचे व्यसन असणारे लोक, घट्ट कपडे घातलेले लोक, निराश्रित, घरदार नसलेले लोक अशा प्रत्येक्ष उष्णतेशी संबंध येणाऱ्यांना उष्माघात होतो. वरील अतिजोखमीच्या लोकांनी उष्णतेच्या लाटेसंदर्भात विशेष काळजी घेतली पाहिजे. उष्णतेमुळे होणार शारीरिक त्रास किरकोळ स्वरूपाचा किंवा गंभीर स्वरूपाचा असतो.

थकवा येणे, ताप येणे, शरीरावर रॅश उमटणे, हातपायांना गोळेयेणे, चक्कर येणे, त्वचा कोरडी पडणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचेनी व अस्वस्थता, बेशुद्धावस्था व मृत्यूही येऊ शकतो. पुरेसे पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा, हलक्या वजनाचे, फिक्ट रंगाचे पांढरे सैलसर कपडे वापरा, उन्हात गॉगल, छत्री, टोपी व पादत्राणे वापरा, ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा, उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रिन क्रिम वापरा किंवा कोरफडीचा गर लावा.
