Post Views: 752
अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करा, मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत निवेदन अखिल भारतीय किसान सभेचे मांगणी
नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधि जाहिद खान :-
नांदगाव खंडेश्वर – तालुक्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. तालुक्यातील 35 हजार हेक्टर शेती बाधित झाली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून राज्य सरकारने सुमारे 2860 कोटीची वाढीव मदत देण्याचा निर्णय घेतला. या संदर्भातील अध्यादेश दिनांक 26 सप्टेंबर 2021 ला जारी केला त्यात राज्यातील 14 जिल्ह्याचा समावेश आहे.
त्यामधून अमरावती जिल्ह्याला वगळण्यात आले आहे म्हणजे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेती अतिवृष्टीमुळे बरबाद झाली आहे. तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही हे स्पष्ट होते. शेतकरी राज्य सरकारच्या मदतीसाठी आस लावून होते या निर्णयामुळे पूर्णतःह हताश झाले. जिल्हात तालुक्यात अतिवृष्टी मुळे पूरपरीस्थिती निर्माण झाल्याने. शेतीचे व नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. आसमानी संकटात सापडलेल्या शेतकरी या निर्णयाने सुलतानी संकटातही सापडल्याचे चित्र आहे.अमरावती जिल्ह्यासह नांदगाव खंडेश्वर तालुका अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्याच्या यादीत समावेश करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्या., पिक विमा तात्काळ द्या 2019-20 चा विमा वाटप करा! तालुक्यातील 6000 हजार शेतकऱ्यांनी शेती नुकसान झाले याबाबतचे अर्ज दाखल केले आहे याचा विचार करावा अन्यथा किसान सभा तहसिलच्या दारात दिवाळी साजरी करेल निवेदन देतेवेळी किसान सभा जिल्हा सहसचिव श्याम शिंदे, तालुकाध्यक्ष दिलीप महले, राहुल मोहोळ, डॉ. संजय पांडे, अंकेश खंडारे, श्याम कुणबीथोप, दिनेश बावणे, प्रवीण वाठोडकर, प्रभाकर खडसे, राजेंद्र पोपळे, आनंदा खडसे, गणेश सोनोने आदी शेतकरी उपस्थित होते.