स्थानिक श्रीमती कोकीळाबाई गावंडे महीला महाविद्यालयातील प्रा. डॉ. चंदा खंडारे यांनी नुकताच दीपोत्सव निमित्त कलाकृती उपक्रम महाविद्यालयात सादर केला आहे.
स्व-कौशल्याने, स्व-खर्चाने बाजारातुन साध्या सुध्या पणत्यां विकत आणल्या आणि त्यासोबत पोस्टर कलर्स व इतर टीकल्यासहीत सजावटीचे साहित्य सुद्धा विकत आणले व आपले स्वतःचे अंगभूत कला कौशल्य वापरून त्याची सुंदर अशी आखीव-रेखीव सजावट केली त्याचा एक संच त्यांनी प्राचार्य डॉ. अविनाश चोखंडे सरांना दिवाळीनिमित्त भेट दिला. त्याप्रसंगी डॉ. गजानन हेरोळे, प्रा. ज्योती हावरे, डॉ. देवलाल आठवले उपस्थित होते. या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांचे महाविद्यालयात सर्वांनी कौतुक केले.