दर्यापुरात इंधन दरवाढी विरोधात युवासेनेचे ‘थाली बजाव खुशिया मनाव’ आंदोलन

दर्यापूर – महेश बुंदे

वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी दर्यापूर शहरात तालुका युवा सेनेच्या वतीने शिवाजी चौकात थाली बजाव खुशिया मनाव आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख प्रमोद धनोकार, उपजिल्हाप्रमुख अंकुश कावडकर यांच्या मार्गदर्शनात तालुकाप्रमुख अभिजित मावळे, विधानसभा समन्वयक प्रतीक राऊत, तालुका चिटणीस राहुल भुंबर, चेतन कोल्हे, रोहन गुदे, लक्ष्मीकांत कोल्हे, सागर गिर्हे, सुरज कैकाडे, सतीश डहाके, नंदू निकोले, सागर वांदे, नीरज नागे, नितीन माहोरे यांनी यावेळी आपली उपस्थिती लावली. सध्या केंद्र शासनाकडून इंधनाचे व घरगुती गॅसचे दर दिवसेंदिवस वाढवल्या जात आहेत, त्यामुळे सामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले असून महागाई कमालीची वाढली आहे.

सध्या डिझेलचा दर १०१ रुपयांच्या वर गेला असून पेट्रोल ११७ रुपयापेक्षा अधिक दराने विक्री केली जात आहे. सर्वाधिक दर असल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. तर घरगुती गॅसचे दर एक हजार रुपयांच्या घरात पोचले असल्याने गृहिणींचे स्वयंपाक घरातील अर्थकारण बिघडले आहे. हा सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी दर्यापूर तालुका युवा सेनेच्या वतीने रविवार ३ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास शिवाजी चौकात थाली बजाव खुशिया मनाव असे अभूतपूर्व इंधन दरवाढ निषेध नोंदविण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थाळी वाजवत घोषणाबाजी केली व केंद्रशासनचा निषेध केला.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!